लहान मुलांच्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही महत्त्वाचे 🤗
संगीता वाघ (मानसोपचारतज्ज्ञ )
2/8/20251 min read
मुलांच्या मानसिक आरोग्याचीही लहान वयापासून पालकांनी योग्य पद्धतीने काळजी घ्यायला हवी.
काळजी काय घ्यावी ते पुढे पाहूया.
मुलांच्या शारीरिक आरोग्याकडे सगळेच पालक लक्ष देतात. मात्र, त्यांच्या मानसिक आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. लहान मुल म्हणजे मातीचा गोळा असतो त्याला जसा आकार देऊ तसं ते घडत जातं. मुलांची पहिली 5 ते 7 वर्ष अतिशय महत्वाची असतात. त्यांना आपण ज्या सवयी लावू, जसे संस्कार करू ते आयुष्यभर त्यांच्या सोबतच
राहतात. त्यामुळे हे संस्कार करतांना लहान मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. अतिशिस्तीमुळे मुलांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. व मुलांच्या मनावर काही ना काही गोष्टींच
सतत दडपण असण्याची शक्यता असते. आणि भविष्यात त्यांना मानसिक ताणतणाव, भीती, निराशा, एकटेपणा अशा समस्यांना सामोरे जातात.
दैनंदिन जीवनातील विविध घटक मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. ज्या घरात सततची भांडण, आरडाओरड, नातेसंबंधात कटूता आढळते अशा मुलांना चिंता, नैराश्य, वर्तणुकीशी संबंधित समस्याचा सामना करावा लागतो. घरच्यांकडून शैक्षणिक अपेक्षांच्या ओझ्यामुळे चिंता आणि तणावाची भावना निर्माण होऊ शकते. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानामुळे विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, ज्यामुळे मुलांमध्ये सायबर क्राईम आणि नकारात्मकता सारख्या समस्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येते. दिवसेंदिवस स्क्रीन टाइम वाढत असून मैदानी खेळांपासून तसेच शारीरीक हलचालींपासून मुलं दूर राहत असल्याची बाब समोर येत आहे.
पालकांनी मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. चिडचिड, सामाजिक सहभाग कमी होणे किंवा मूड स्विंग्ज सारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये, अशा प्रकारची लक्षणे असल्यास आपल्या मुलाला मानसिक आधाराची गरज असल्याचे दिसून येते. गुणवत्तेत होणारी घट किंवा त्यांनी एकदा उपभोगलेल्या क्रियांमधील रस कमी होणे हे देखील धोक्याचे संकेत आहेत. खाण्याच्या आणि झोपण्याच्या पद्धतींमध्ये होणारा बदल, वारंवार डोकेदुखी किंवा पोटदुखी यामुळे देखील आपले मुल तणावाचा सामना करत आहेत यावरून आपण समजू शकतो.
अशी' घ्या काळजी 🤗
1) मुलांच्या भावना ओळखणे.
राग आल्यावर मुले वस्तू फेकतात, आदळआपट करतात अनेकदा मुलांना त्यांच्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे समजत नाही. त्यांना लहानवयापासून समजून घेतलं आणि समजून सांगितलं तर याचा चांगला फायदा होऊ शकतो.
रंगोपचार एक प्रभावी माध्यम होऊ शकतो. बालक हे चित्र आणि रंग यातून व्यक्त होते. त्यांना चित्र काढण्याची, रंग भरण्याची सवय लावावी, नकारात्मकता दूर व्हावी, आत्मविश्वास वाढावा म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे. व्यक्त होण्यासाठी चित्रकला खूप सुंदर माध्यम आहे. मनातील भावना चित्र, रंगाद्वारे वाचल्या जाऊ शकतात. मैत्री, प्रेम, आकर्षण याबाबत मोकळेपणाने चर्चा करून हार्मोन्समध्ये होत असलेला बदल समजावणं. तसेच सेरोटॉनिन, डोपामाईन याचे आपल्या शरीरात होणारे स्रवण आपल्याला आनंद देतात.
२)मुलांचे रुटीन असायला हवे.
मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी रोजचे वेळेचे वेळी ठरवून दिलेली कामे जसे. याच वेळी झोपायला हवे, जेवणाचा वेळ, खेळण्याचा वेळ हे फिक्स असेल तर याचा मुलांना खूप फायदा होतो. पालकांनी स्क्रीन टाईमकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शारीरिक आणि सामाजिक विकासास प्रोत्साहन देणाऱ्या कृतींना प्रोत्साहन द्यावे. त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करावे. श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा ध्यानधारणा केल्याने मुलांना तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करण्यास मदत होऊ शकते.
3) मुलांमधील कौशल्ये विकसित करा.
मुले जसे मोठे होतात तसे त्यांच्यातील सुप्तगुणांची देखील सोबतच वाढ होत असते. मात्र त्या सुप्तगुणांना योग्य वेळी चालना मिळाली नाही तर ते सुप्तगुण लुप्त होतात आणि त्याचाच परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो. आणि आयुष्यात असामान्य कामे करायला प्रभावशाली व्यक्तिमत्वची जडणघडण होणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी योग्य वेळी त्या गुणांचे संवर्धन होणे तेवढेच गरजेचे आहे, जेवढे की त्यांची शारीरिक वाढ होणे आणि याच सुप्तगुणांचा म्हणजे कौशल्याचा विकास करणे हे पालकांसाठी सर्वात मोठे जबाबदारी आहे. मुलांना फक्त शाळेतील पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहार ज्ञान शिकायला पाहिजे. समाजात बोलतांना, वागतांना, कसे वागावे हे शिकवायला हवे.
4) संधी देणे.
घरातील कामात छोट्या-छोट्या व्यवहारात मुलांना संधी देणे त्यामुळेच त्यांचा न कळतं आत्मविश्वास व निर्णय क्षमता वाढते. मुलांना काही गोष्टी करून बघण्याची, लहानमोठ्या जबाबदाऱ्या घेण्याची सवय असायला हवी. यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा चांगला विकास होतो. मोठ्यापणी निर्णय घेताना अडचणी येत नाही.
Healing
Expert psychological counselling for personal growth.
Support
Care
www.wingsofdreamscounsellingandtherapycenter.com
+91 8329087147 (WhatsApp)
© 2025. All rights reserved.
+91 9607652065
Location
Talegaon-Chakan Road, Lane opposite Walekar Misal, Near Tuljabhawani Temple, Vatannagar, Talegaon Dabhade, Pune. 410507