आनंदी जगण्याची वाट शोधा.
संगीता वाघ (मानसोपचारतज्ञ.)
7/16/20251 min read
आनंदी जगण्याची वाट शोधा🤗.
एकेकटं वाटतं , कसंतरी वाटत हि समस्या महिलांमध्ये नेहमी जाणवते . सतत डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, हे आजार महिलांना नेहमी छळत असतात.
रोज त्याच त्या तक्रारी एकूण घरचे हि दुर्लक्ष करायला लागतात. " रोज मरे त्याला कोण रडे " या भावनेतून त्रास वाढत जातो. कुणाला सांगितलं तर आपल्याला नक्की काय होतंय हे समोरच्याला समजत नसते, ते त्यांच्या परीने उत्तर देण्याचा प्रयन्त करतात. १. तू जास्त टेन्शन घेतेस . २. तू ओव्हरथिंग करतेस . ३. या वयात असच होत. असे उडवा-उडवीचे उत्तरे तर अनेक मिळतात. पण त्यावर समाधान किंवा उपाय मात्र एकही नसतो .
मन सारखं आतल्याआत रडते, शरीर थकल्यासारखे वाटते, आणि अश्यातच घरातल्याना सुद्धा वाटू लागते की, हिला सुख टोचते आहे. किंवा हिला अटेन्शन (सिकिंगचा आजर) घेण्याची सवय झाली आहे. कोणीही समजून घेत नाही. आणि एकीकडे सल्ल्याचा पूर आलेला दिसतो. तुझं हे चुकतेय तुझं ते चुकतेय असे प्रत्येक ठिकाणी आयुष्य विषयावर प्रेरणादायी भाषण दिल्या जाते. त्यातूनही मन खचत जाते की, हे इतरांसाठी इतकं सोपं आहे त्यांना ते सहज जमते आणि आपल्यालाच का जमत नाही ?
कुणाशी बोलायला गेले कि मिळतात ते फक्त सल्लेच ! आणि आपण किती बावळट आहोत असं वाटून न्यूनगंडच वाढतो.
सर्व बाजूनी कोंडी झाल्यासारखं वाटते. या जगात आपल्याला कोणी समजून घेत नाही ! मी कोणत्याच लायकीची नाही! यामध्ये आत्मविश्वास कमी होतो, चारचौघात जायला बंद करतो, मैत्रिणीपासून स्वतःला दूर ठेवतो, मला कोणी नाव ठेवेल का? या विचारामुळे बऱ्याच महिला घरातच राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो, आणि मग फक्त जेवण आणि झोप इतकंच आयुष्य उरत.
काही महिन्यानंतर आपल्या मनाची कंडिशनिंग होऊ लागते आणि मग आपण स्वतः कडे व जगाकडे त्याच दुष्टीकोनातून पाहू लागतो. त्यामुळे आपण कुणाशी याबाबत बोललं तर त्यानं / तिने माझ्या गोष्टी गावभर केल्या तर काय ? या विचाराने हळूहळू बोलणं कमी करतो. आणि जर अश्यातच घरच्या जबाबदाऱ्या, आर्थिक ताण वाढलेले असतील तर मानसिक कोंडी अधिक त्रासदायक ठरते.
यातून बाहेर पडण्यासाठीचे उपाय :-
इतरांशी बोलण्याअगोदर स्व-संवाद महत्वाचा आहे. आपल्याला काय आवडते काय आवडत नाही या छोट्या-छोट्या गोष्टीतुन सुरवात करा. लहान काम जरी केले तरी स्वतःला शाब्बासकी द्या. छान आवडेल तो पदार्थ बनवून खा, फिरायला जा, शॉपिंग करा, मंदिरात जा, व्यायाम करा या गोष्टीमुळे तुमची गाडी रस्त्यावर येऊ लागेल.
यातही काही जण शंका घेतात यातून बर होणे इतकं सोपं आहे ?
याच उत्तर एकच आपल्या आयुष्यच रिमोट आपल्या हातात घेतलं कि सर्व शक्य आहे . आपण इतरांना फक्त दोष देऊ शकतो, पण त्याच्या चुका आणि वागणे आपण नाही बदलू शकत. म्हणून सोपी गोष्ट हि आहे कि,आपण आपल्या विचारात आणि कृतीत बदल करून घेतलेला बरा. आणि हा बदल करण्यासाठी आपल्याला स्वतःहून वेळ काढावा लागतो. इतरांवरचा फोकस कमी करून स्वतःवर फोकस वाढवावा लागतो. हाच मानसिक आरोग्य जपण्याचा खरा उपाय आहे .
Healing
Expert psychological counselling for personal growth.
Support
Care
www.wingsofdreamscounsellingandtherapycenter.com
+91 8329087147 (WhatsApp)
© 2025. All rights reserved.
+91 9607652065
Location
Talegaon-Chakan Road, Lane opposite Walekar Misal, Near Tuljabhawani Temple, Vatannagar, Talegaon Dabhade, Pune. 410507